By  
on  

सोनाली कुलकर्णीची आता ‘वेब इनिंग’, या वेबसिरीजमध्ये झळकणार

सध्या बोलबाला आहे तो वेबसिरीजचा. एक नवीन पण प्रभावी माध्यम म्हणून अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झाला आहे. वेबसिरीजमध्ये विविध विषयांची मांडणी हटके पद्धतीने केली जाते. महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी देखील वेबसिरीजच्या प्लॅटफॉर्मवर पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bv_0vJsl1Xh/?utm_source=ig_web_copy_link

सोनाली वेब प्लॅटफॉर्मवर सिद्धार्थ चांदेकरसोबत झळकणार आहे.  सोनाली- सिद्धार्थची वेब सीरिज ‘मनातल्या मनात’ ८ एप्रिलपासून सेवा शेमारूमीवर प्रदर्शित झाली आहे. ही वेबसिरीज रोमॅंटिक कॉमेडी प्रकारात मोडणारी आहे. साधारणत: पाच भागात ही वेबसिरीज प्रसारित होईल. वेब सीरिजचे लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे तर संदीप नवरे याचे दिग्दर्शक आहेत. सिद्धार्थ आणि सोनाली या वेबसिरीजमध्ये अभिषेक आणि शिवानी या लव्हबर्डसची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive