By  
on  

या सेलिब्रिटी कपलने गुपचुप उरकला साखरपुडा, जाणून घ्या

मराठी सिनेसृष्टीमध्ये सधया जोरदार लगीनघाई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकतायत.  तर नुकतंच एका सेलिब्रिटी कपलने वर्षापूर्वीच गुपचुप साखपुडा उरकल्याचं समोर आलं आहे. मुळशी पॅटर्नमधला राहुल्याचा जिगरी दोस्त आठवतोय ना..तसंच बन मस्का आणि देवा शप्पथ या मालिकांमुळे अभिनेता क्षितीश दाते हा चेहरा लोकप्रिय आहे. तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाला सखी ही मॅटवर कुस्ती शिकवताना दिसते. तीच सखी म्हणजे अभिनेत्री ऋचा आपटे. या दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर आलं आहे.  

आता सोशल मीडिया पोस्टद्वारे ऋचाने एक वर्षभरापूर्वी साखरपूडा केल्याचे सांगितले आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rucha apte (@rucha.apte)

 

ऋचाने अभिनेता क्षितीश दाते याच्याशी साखपुडा केला आहे. त्याच्यासोबतचा फोटो ऋचाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणते ‘या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं आहे’ . या सोबतच 2020 मध्ये साखरपुडा संपन्न झाल्याचा हॅशटॅग ऋचाने यात वापरला आहे. अनेेक प्रसिध्द सेलिब्रिटींसह चाहत्यांनी ऋचाच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

क्षितीश आणि ऋचाने ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र काम केले. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. त्यानंतर हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive