By  
on  

'अदृश्य' या आगामी सिनेमाच्या सेटवर मंजिरी फडणीस आणि पुष्कर जोग यांची दिसली जबरदस्त केमिस्ट्री

अभिनेता पुष्कर जोग आणि बॉलिवूड अभिनेत्री मंजिरी फडणीस यांच्या अदृश्य या आगामी मराठी चित्रपटात ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकतेय. डेहराडून, उत्तराखंड येथील नयनरम्य परिसरात  या सिनेमाचं चित्रिकरण पार पडतंय. या सेटवरचे काही इनसाईड फोटोज् नुकतेच समोर आले आहेत. या आगामी थ्रीलर सिनेमात पती-पत्नीच्या भूमिकेत असलेले पुष्कर आणि मंजिरी यांची जबरदस्त केमिस्ट्री यात दिसतेय. 

बॉलिवूड आणि टॉलीवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल निर्मित लवली वर्ल्ड प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'अदृश्य' चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. 
 

 

 

 

 
'अदृश्य' या मराठी  चित्रपटात मंजरी फडणीस, सौरभ गोखले आणि पुष्कर जोग तसेच अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता अजय कुमार सिंह, आनंद जोग मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive