By  
on  

अंकुश चौधरीची अभिनेत्री पत्नी ह्या मालिकेतून करतेय पुनरागमन

अभिनेता अंकुश चौधरी हा मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार आहे. संपर्ण महाराष्ट्रात त्याचे तमाम चाहते आहते. आपल्या दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं तो जिंकतो. अंकुश प्रमाणेच त्याची पत्नी दीपा परब-चौधरी हीसुध्दा मराठी सिनेविश्वातील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. लग्नानंतर घर –संसार यामुळे ती फारशी सक्रीय नव्हती. फक्त जाहिरातींमधून झळकायची. पण आता दीपा एका हिंदी मालिकेद्वारे दमदार पुनरागमन करतेय. 


 

दीपानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आगामी मालिकेतला तिचा लुक शेअर करत तिच्या पुनरागमनाची चाहत्यांना माहिती दिली. स्टार प्लस वाहिनीवरील शोर्य और अनोखी कहानी या हिंदी मालिकेद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 

 

दीपाने शेअर केलेल्या या  पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 
 

दीपा आणि अंकुश यांनी केदार शिंदे यांच्या ऑल द बेस्ट नाटकात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर या दोघांनी 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना प्रिन्स नावाचा एक गोड मुलगासुध्दा आहे. 

दीपाने यापूर्वीसुध्दा अनेक हिंदी मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive