By  
on  

म्हणून सर्वांचा लाडका अभिनेता यशोमान आपटे झाला ट्रोल

छोट्या पडद्यावरचा तरुणाईचा लाडका अभिनेता म्हणून यशोमान आपटे याने आपली ओळख निर्माण केली आहे. 'फुलपाखरु' या मालिकेतील मानसच्या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरांत आणि रसिकांच्या मनामनांत पोहचला. त्यानंतर 'आनंदी हे जग सारे', गाण्यांचा रिएलिटी शो 'सिंगीग स्टा'र या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांसमोर आला. सध्या यशोमान 'श्रीमंताघरची सून' या मालिकेतील अथर्व ही भूमिका साकरतोय. पण सध्या सर्वांचा हा लाडका अभिनेता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 


त्याचं झालं असं   एका आगामी सिनेमाच्या प्रोजेक्टचा नुकताच यशोमानने श्रीगणेशा केला. त्याच्या या प्रोजेक्टच्या मुह्रूर्तादरम्यान गणेशपूजनाच्या वेळी यशोमानने पायात शूज घातलेले पाहायला मिळतायत. याच कारणाने तो प्रचंज ट्रोल होतोय. बाप्पाची पूजा करताना कोण शूज घालतं, अशाप्रकारच्या कॉमेंट्स त्याच्या या फोटोवर येण्यास सुरुवात झालीय  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive