By  
on  

अखेर पुजा सावंत आणि गश्मीर महाजनीच्या ‘त्या’ मेसेज मागचं सत्य आलं समोर

काल पासून सोशल मिडियावर चर्चा आहे ती पुजा सावंत आणि गश्मीर महाजनीची. डॅशिंग अभिनेता गश्मीर महाजनीला प्रसिध्द अभिनेत्री पूजा सावंत डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन वीक सुरु असतानाचा या दोघांमधील खास मेसेज समोर आले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात असलं तरी महत्त्वाचं महणजे गश्मिर हा विवाहीत आहे. तरी देखील या चर्चांना उधाण आलं होतं. 

 

 

पण पुजाने एक व्हिडियो शेअर करत या चर्चेवर पडदा टाकला आहे. पुजा आणि गश्मीर ‘लव्ह यु मित्रा’ या सिनेमासाठी एकत्र येते आहे. ‘मित्र ही एक अशी व्यक्ती असते जी कायम आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते.  Mini Films Presents ... लव्ह यू मित्रा !! मानसी बागला या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive