By  
on  

गँगस्टर अरुण गवळी होणार आजोबा, लेकीकडे आहे गुड न्यूज

गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे यांनी यंदा लॉकडाऊन दरम्यान  ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडणार होता, परंतु करोना संकटामुळे अगदी साध्या पध्दतीने हा विवाह डॅडींच्या दगडी चाळीत संपन्न झाला होता. 

 गॅंगस्टर अरुण गवळी हे लवकरच आजोबा होणार असल्याचं समजतंय. लेक योगिता आणि जावई अक्षय वाघमारे यांच्याकडे गुड न्यूज आहे. अभिनेता अक्षय वाघमारेनेच प्रेग्नेंट पत्नी योगितासोबतचा फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली. संपूर्ण कलाविश्व तसंच चाहत्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तर फत्तेशिक्सत या सुपरहिट सिनेमात अक्षयने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive