By  
on  

Trailer Out : सखी गोखले आणि सिध्दार्थ चांदेकरची 'बेफाम' केमिस्ट्री

‘तू धुक्याची मेघ राणी, 
पावसाची चिंब कहाणी’ 

अशा प्रेमळ भाषेत प्रेमाचेच बोल ओठावर आणत आणि रोमॅंटिक अशा नव्या जोडीसह एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणाऱ्या या गाण्यांच्या बोलानी तर जणू हृदयाचा ठेकाच चुकविला आहे. सध्या रसिक प्रेक्षकांत रोमॅंटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्त आढळून येत आहे. त्यातच भर म्हणून ‘बेफाम’ चित्रपटातील या गाण्याने तर चारचाँदच लावलेत. या शिवाय चित्रपटातील गाण्यासह चित्रपटाच्या ट्रेलरने ही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे यांत शंकाच नाही. आकर्षणाची बाजू म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सखी गोखले यांची नवी कोरी जोडी रोमॅंटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. 

यश आणि अपयशाचे समीकरण मांडणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर एक वेगळाच प्रवास दर्शवितो. याच्याच जोडीला प्रेमाच्या नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडविणाऱ्या प्रेमगीतांचा वर्षाव या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रोमॅंटिक गाण्यांसह चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत निर्माता अमोल लक्ष्मण कागणे निर्मित हा चित्रपट दिग्दर्शक कृष्णा कांबळे दिग्दर्शित आहे. शिवाय ‘बेफाम’ हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे आणि अभिनेत्री प्रीतम लक्ष्मण कागणे प्रस्तुत असून लेखक विद्यासागर अध्यापक लिखित या चित्रपटाचे कथानक आहे. सिद्धार्थ आणि सखीसह या चित्रपटात अभिनेते विद्याधर जोशी, शशांक शेंडे, कमलेश सावंत, महादेव अभ्यंकर, नचिकेत पर्णपुत्रे आणि अभिनेत्री सीमा देशमुख यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळणार आहे. निर्माता अमोल कागणे सह एक्झिक्युटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी निर्माता मिथिलेश सिंग राजपुत याने उत्तमरित्या पेलली. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शक हर्षवर्धन तानपुरे यांचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय या चित्रपटास लाभलेले प्रोडक्शन मॅनेजर म्हणून अजय सोनी, डीओपी प्रसाद भेंडे, संकलक राजेश राव, कला दिग्दर्शक नितीन बोरकर, डान्स मास्टर उमेश जाधव यांची ही कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. संगीतकार अमितराज आणि मंदार खरे यांच्या संगीताने चित्रपटाची शान वाढविली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

तरुणांना आकर्षित करणाऱ्या ‘बेफाम’ या चित्रपटाचा ट्रेलर युवा पिढीला यश अपयशाच्या समीकरण आणि चित्रपटात होणाऱ्या प्रेमाच्या गाण्यांचा वर्षाव नक्कीच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवेल. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता ‘बेफाम’ चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल यांत शंकाच नाही. येत्या २६ फेब्रुवारी २०२१ ला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive