By  
on  

अभिनेता सुबोध भावे घोड्यावर स्वार होऊन कसली करतोय तयारी ?

मराठी सिनेविश्वातला आघाडीचा अभिनेता सुबोध भावे त्याच्या सिनेमांसाठी आणि त्याच्या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेत असतो. याचा प्रत्यय त्याच्या सिनेमामंधून येतच असतो. नेहमीच प्रेक्षकांसमोर तो काही ना काही नवीन घेऊन येतो.सध्या चंद्र आहे साक्षीला या रहस्यमय मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. 
पण सध्या सुबोध भावे  कोणत्यातरी महत्त्वपूर्ण भूमिकेची तयारी करताना पाहायला मिळतोय.सुबोध भावेने दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत अलिकडेच अभ्या मित्रा आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या नव्या अध्यायासाठी तुला आणि आपल्या संपूर्ण संघाला खूप खूप शुभेच्छा !

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

अलिकडेच सुबोध घोडेस्वारी करताना पण दिसला. बहुतेक ही सर्व तयारी दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांच्या ऐतिहासिक 'पावनखिंड' सिनेमासाठी आहे. असं दिसतंय. आणि काशिनाथ घाणेकर सिनेमाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे पोस्टर रिलीज करुन मागच्या वर्षी या सिनेमाबाबतची माहिती चाहत्यांना दिली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

"तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला…" कथा त्या एका रात्रीची जिने मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकला…ही कथा आहे बाजी प्रभू देशपांडेंची- आपल्या आयुष्याचा प्रवास मावळतीकडे सुरु झालेला असताना, स्वराज्याच्या उगवत्या सुर्याला- वीर शिवाजीला, त्यांनी दिलेल्या प्राणांच्या अर्घ्याची….अशी  पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेत.

बाजीप्रभूंच्या भूमिकेत सुबोध भावेला पाहण्याची रसिकांना प्रचंड उत्सुकता लागली  आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive