By  
on  

स्वानंदी बेर्डे का म्हणतीये ‘धनंजय माने इथेच राहतात’ जाणून घ्या

मराठी प्रेक्षकाच्या चेह-यावर आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हे वाक्य पडलं की हसू उमटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तोंडी असलेलं हे वाक्य आता लेक स्वानंदीही उच्चारताना दिसणार आहे. स्वानंदी ‘धनंजय माने इथेच राहतात' या नाटकातून अभिनयात पदार्पण करते आहे. हे एक विनोदी नाटक आहे. राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.

 

 

या नाटकात अभिनेत्री प्रिया बेर्डेही दिसणार आहे. श्री व सौ माने हे कॅप्शन देत स्वानंदीने हा फोटो शेअर केला आहे. स्वानंदीचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. वडिलांप्रमाणेच स्वानंदीनेही  नाटकामधूनच अभिनयाचा श्रीगणेशा केला असल्याने चाहत्यांना या नाटकाची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive