By  
on  

या मराठी अभिनेत्याच्या संपूर्ण परिवाराला झाला होता करोना , पत्नी आहे प्रेग्नंट

भय इथले संपत नाही...  करोना परिस्थितीमुळे सध्या राज्यात तसंच चित्र आहे. अजूनही रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय.राज्यात गेल्या २४ तासात ३,३६५ नव्या रुग्णांची भर तर २३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसंच  उपचाराधीन रुग्ण संख्येतही वाढ झाल्याचं आकडेवारी सांगतेय. याच पार्श्वभूमीवर एका प्रसिध्द मराठी अभिनेत्याने सर्वांना एक कळकळीची विनंती केली आहे.

हा प्रसिध्द मराठी अभिनेता म्हणजे आरोह वेलणकर. आरोहच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचं निदान 15 जानेवारी रोजी झालं. यात त्याच्या 92  वर्षांच्या आजोबांचासुध्दा समावेश होता. संपू्र्ण कुटुंबाने नेटाने करोनाचा सामना केला. महत्त्वाचं म्हणजे आरोहची पत्नी ही प्रेग्नेंट आहे. अलिकडेच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. पण ती तिच्या आईकडे राहायला गेल्यामुळे या करोना संकटात ती सुरक्षित राहिली. तसंच आरोहसुध्दा 'लाडाची मी लेक गं' या मालिकेच्या शूटींगनिमित्ताने मुंबईत आहे. म्हणून तोसुध्दा सुरक्षित राहिला. 

पण या अनुभवातून आरोह म्हणतो मला खुप काही शिकायला मिळालं. करोना विषाणू आणि त्याचा संसर्ग अद्यापही आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मास्क लावणं, सतत सॅनिटायझरचा उपयोग करणं, अशा लहान लहान वाटणा-या गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणं अनिर्वार्य आहे. '

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive