By  
on  

आली रे आली आर्ची आली ! रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी

2016 मध्ये आलेल्या सैराट सिनेमाची क्रेज कायम आहेच. पण त्याहुनही कायम आहे ती आर्ची उर्फ रिंकू राजगुरुची क्रेझ. रिंकूने नांदेडमधील एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. यात ती खुपच सुरेख दिसते आहे. या कार्यक्रमाला रिंकू आल्याचं समजल्यावर चाहत्यांची एकच झुंबड उडाली. 

 

 

अशावेळी गर्दीला आवरण्यासाठी तेथील आयोजकांनही बरीच धावपळ करावी लागली. यावेळी समोर आलेल्या व्हिडियोमध्ये रिंकूने तिचा फेमस डायलॉगही म्हटला आहे. रिंकूला दर्शनासाठी झालेली गर्दी पाहता लोकांना जणू करोनाचा विसर पडला की काय असाच प्रश्न निर्माण झाला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive