By  
on  

जब्याचा शालूचा बदलला अंदाज, दिसली इतकी ग्लॅमरस

समाजाच्या उतरंडीवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे फॅण्ड्री. या सिनेमाने प्रेक्षकांना आपलंस केलं. यासोबतच भुरळ पाडली ती शालूने. फॅण्ड्रीमधीलसाधी सरळ शालू अनेकांना आवडली. शालूची भूमिका राजेश्वरी खरातने साकारली होती. सिनेमात साधी दिसली असली तरी राजेश्वरी प्रत्यक्ष आयुष्यात भलतीच ग्लॅमरस आहे.

 

 

राजेश्वरी अनेकदा तिचे डान्स व्हिडियो शेअर करत असते. याशिवाय तिच्या स्टायलिश लूकचंही चाहते कौतुक करत असतात. फॅण्ड्रीनंतर राजेश्वरी अ‍ॅटमगिरी सिनेमात दिसली होती. आता ती पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी दिसते यासाठी तिचे चाहते वाट पाहात असतील यात शंका नाही.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive