By  
on  

दिग्पाल लांजेकर आता उलगडणार ‘शेर शिवराज है’ चा भव्य पट

आज वातावरणात उद्याच्या शिवजयंतीचा उत्साह भरून राहिला आहे. या पुर्वसंध्येला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने खास घोषणा केली आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि जंगजोहरच्या घोषणेनंतर दिग्पाल लांजेकर आगामी ‘शेर शिवराज है’ हा सिनेमा घेऊन भेटीला येत आहेत. 

 

 

या सिनेमाचं पोस्टर शेअर करत दिग्पालने सिनेमाची घोषणा केली आहे.  इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है। तेज तमअंस पर कान्ह जिमि कंस पर त्यों म्लेंछ बंस पर 'शेर शिवराज है।' पुष्प चौथे... फेब्रुवारी 2022.. हे कॅप्शन देत दिग्पालने या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांना ऐतिहासिक अफजल खान वधाचा थरार पडद्यावर पुन्हा अनुभवता येणार आहे. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive