By  
on  

अभिनेत्री आसावरी जोशी तब्बल 12 वर्षांनी करणार मराठी मालिकेत पुनरागमन

हिंदी, मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री म्हणजे आसावरी जोशी. गेले अनेक वर्षं आसावरी या मराठी मालिकांमध्ये दिसल्या नव्हत्या. पण आता तब्बल 12 वर्षांनी त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत. स्वाभिमान या नव्या मालिकेत आसावरी जोशी दिसणार आहेत. या मालिकेत त्या आदिती सुर्यवंशी या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.

 

 

 

यामध्ये त्या प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसतील. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कश्या पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive