By  
on  

जात महत्त्वाची नसून अन्यायाविरुध्द लढणे महत्त्वाचे : रिंकू राजगुरु

नुकताच शिवजयंती उत्सव पार पडला. परंतु यंदा करोनामुळे साधेपणानेच हा उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिवजयंतीच्या विविध प्रकारे शुभेच्छा दिल्या. पण यात रि्ंकूची पोस्ट चर्चेत राहिली. सैराटची आर्ची म्हणून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून ती या मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव सुरु आहे. हा फोटो शेअर करत तिने, “छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता” असे  म्हटले आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive