By  
on  

या मराठी अभिनेत्रीने असं डोक्यापासून पायापर्यंत झाकलं स्वत:ला

मराठी सिनेसृष्टीतले कलाकार नेहमीच चाहत्यांना आश्चर्याचे धक्के देत असतात. असाच एक हटके लुक शेअर करत या आघाडीच्या मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना सरप्राईज केलं आहे. डोक्यापासून पायापर्यंत तिने स्वत:ला झाकून घेतलं आहे. रणरणत्या उन्हात घागरा चोली आणि त्यावर चादर ओढून उभी असलेली ही मराठी अभिनेत्री कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सई ताम्हणकर आहे. 

सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असणारी सई बोल्ड आणि ब्युटिफुल फोटोशूट करत चाहत्यांची मनं जिंकते. पण यावेळस मात्र ह्या भन्नाट फोटोशूटमधून सईने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अनेकांनी सईच्या फोटोवर, ओ स्त्री कल आना..! अशा धम्माल कमेंट्स केल्या आहेत.

इंडीया लॉकडाऊन हा  भारतातल्या मागच्यावर्षीच्या करोना काळातील परिस्थितीवर भाष्य करणारा बॉलिवूड सिनेमा येतोय. मधुर भांडारकर या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. या सिनेमात सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. या सेटवरचाच सईचा हा फोटो व्हायरल होतोय. 

 

 

 

'इंडिया लॉकडाउन’  चित्रपटात सई ताम्हणकरसह प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, अहाना कुमरा, जरीन शिहाब आणि प्रकाश बेलवाडी मुख्य भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive