By  
on  

Photos : प्रार्थना बेहरेच्या या मनमोहक अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील  आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. 

आतासुध्दा प्रार्थनाने एक झक्कास फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेपासून करीअरची सुरुवात केलेल्या प्रार्थनाने आज प्रेक्षकांच्या मनात खास असं स्थान बनवलं आहे.

 

 

 

 प्रार्थनाने आतापर्यंत मितवा, मिस्टर आणि मिसेस सदाचारी, रेडीमिक्स,कॉफी आणि बरंच काही या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर दोन वर्षांपूर्वी  ती ‘ती & ती’ सिनेमात दिसली होती. यासोबतच लॉकडाऊननंत प्रार्थनाने परदेशात तिच्या आगामी छुमंतर या सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी. ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

 

 

तसंच प्रार्थना आणि सोनाली कुलकर्णी ती आणि ती सिनेमानंतर आगामी फ्रेश लाईम सोडा सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. प्रार्थनाच्या पचीची कंपनी रेड बल्ब स्टुडिओज या सिनेमाची निर्मिती करतेय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive