By  
on  

‘त्या’ भयानक प्रसंगानंतर गंगाने पुन्हा एकदा शेअर केला व्हिडियो, पाहा काय म्हणाली ती

‘कारभारी लयभारी’ मालिकेतील गंगाला अलीकडेच  एका भयानक अनुभवाचा सामना करावा लागला.  गंगा ने स्वतः व्हिडिओ द्वारे ही माहिती शेअर केली आहे. यावेळी तिची अवस्था अत्यंत भेदरलेली असल्याचंही या व्हिडियोमध्ये दिसून येत होती. ती मुंबईतील एका बस स्टॉप वर बसची वाट पाहत असताना काही मुलांनी विनाकारण तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती घाबरून गेली व तिथून ऑटो मध्ये घराकडे निघाली. वाटेत ऑटो मध्येच तिने लाईव्ह येऊन घाबरलेल्या अवस्थेत फॅन्ससमोर ही कैफियत मांडली होती. 

 

 

पण यानंतर पुन्हा एकदा तिने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती पोलिसांचे आभार मानताना दिसते आहे. आहे. ‘ आज हा व्हिडियो शेअर करण्याचं खास कारण आहे. आता मी थोडी बरी आहे. जो काही प्रसंग घडला त्यातून मी सावरले आहे. पण, या व्हिडीओच्या माध्यमातून मला अनेकांचे आभार माननार आहे. सगळ्यात प्रथम मुंबई पोलीस, मुंबई कमिशनर यांचे अगदी मनापासून आभार. त्यांनीच मला प्रथम मदतीचा हात दिला. या गोष्टीसाठी मी आयुष्भर तुमची ऋणी असेन, त्यानंतर दुसरे आभार पंतनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांचे त्यांनीदेखील एकही सेकंद व्यर्थ न घालवता मला मदत केली, आणि तिसरे आभार तुम्हा सगळ्या रसिकप्रेक्षकांचे. तुम्ही इतकं सगळं माझ्यावर मनापासून प्रेम केलंत. असंच प्रेम कायम करत राहा.’ ‘कारभारी लयभारी’ मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात असताना गंगावर हा हल्ला झाला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive