फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं, हे खुपच अभिमानास्पद आणि स्वप्नवत : शुभंकर तावडे

By  
on  

2019ला रिलीज झालेल्या ‘कागर’ चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची घोडदौड सुरू करणा-या अभिनेता शुभंकर तावडेवर ह्या फिल्मनंतर कौतुकाचा सातत्याने वर्षाव झाला.  आणि आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने पुरस्कार देऊन गौरविले आहे.

शुभंकर तावडेला यंदाचा ‘बेस्ट डेब्यु फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला आहे. आपल्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर पुरस्काराने भारावलेला शुभंकर तावडे प्रतिक्रिया देताना म्हणाला,”फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं, हे खुपच अभिमानाचं आणि स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या प्रत्येक अभिनेत्याचे हे स्वप्न असतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना अतिशय आनंद होतोय.”

शुभंकर पूढे म्हणतो, “मला कागरचे दिग्दर्शक मकरंद माने ह्यांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत. कारण, माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्यामध्ये त्यांनी कागरमधला हिरो पाहिला. मी सिनेमातला हिरो बनू शकतो. हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचे (अभिनेता सुनील तावडे) मार्गदर्शनही मला सातत्याने मिळत गेल्याने मी आजवर इथवर पोहोचलो. सर्वात महत्वाचे म्हणजे, मला हा पुरस्कार मिळण्यात प्रेक्षकांचा मोठ वाटा आहे. त्यामुळे त्यांचेही आभार.”        

Recommended

Loading...
Share