By  
on  

रवी जाधव यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणलीये ही ‘रंपाट’ जोडी

दिग्दर्शक रवी जाधव सध्या आजून एक भन्नाट सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रंपाट’ असं हटके नाव असलेल्या या सिनेमाची जोडी देखील तितकीच बिनधास्त आहे. या सिनेमातून रवी जाधव अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी ही हटके जोडी रसिकांसमोर येत आहे. या जोडीला रसिकांसमोर आणताना त्यांनी एक खास कॅप्शन देखील दिलं आहे.

सोलापूरहून आला है वह,
कितना नया है यह!!!
आजभी फेकलेलं पैक नही ऊठानेवाला, माँ का परवाना, सिनेमा चा दिवाना...
मिथुन!!!!!

https://www.facebook.com/ravijadhav/videos/285854988972094/

या सिनेमात अभिनयच्या व्यक्तिरेखेचं नाव मिथून आहे. स्टायलिश, बिनधास्त आणि दिलफेक मिथून रसिकांना आवडेल यात शंका नाही. यासोबतच रवी यांनी सिनेमाची हिरॉईन कश्मिरा हिचा व्हिडियोही शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना रवी म्हणतात,

हिला बघून भल्याभल्यांच्या छातीत भरते धडधड!
ही आहे आतून कणखर, बाहेरून कडकड!!
कोल्हापूरच्या 'रंपाट' मुन्नीच्या भूमिकेत कश्मिरा परदेशी

रंपाटअधील मुन्नी दिसायला जितकी गोड आहे, वागायला तितकीच कडक आहे. कब्बडी खेळणा-या मुन्नीचं हिरॉइन व्हायचं स्वप्न पुर्ण होणार का यासाठी सिनेमा पाहावा लागेल. हा सिनेमा १७ मे २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.facebook.com/694361174/videos/10156009749101175/

 

Recommended

PeepingMoon Exclusive