By  
on  

'जिवलगा'मधील 'विश्वास'ची व्यक्तिरेखा माझ्या सगळ्यात जवळची: स्वप्नील जोशी

ब-याच दिवसांनी अभिनेता स्वप्नील जोशी ‘जीवलगा’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला आहे. जीवलगामध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव विश्वास आहे. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या मालिकेत सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे आणि अमृता खानविलकर हे कलाकार आहेत.

https://www.instagram.com/p/BwJx_cCnCzY/?utm_source=ig_web_copy_link

स्वत:च्या व्यक्तिरेखेबाबत बोलताना स्वप्नील म्हणतो, ‘विश्वासची व्यक्तिरेखा माझ्या खुप जवळची आहे. त्याच्या नात्याविषयी संकल्पना क्लिअर आहेत. विश्वास थोडासा टीपिकल नवरा या व्याख्येत बसणारा असला तरी जुन्या मताचा अजिबात नाही. विश्वासची व्यक्तिरेखा कुणीही प्रेमात पडावं अशीच आहे.’ जीवलगा या मालिकेबद्द्ल प्रोमोपासूनच रसिकांच्या मनात उत्सुकता आहे. या मालिकेत आता आणखी कोणती वळणं येतात याची रसिकांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive