By  
on  

अभिनय क्षेत्रात येण्यासाठी घरून झाला होता या मराठी अभिनेत्रीला विरोध

झगमगत्या चंदेरी दुनियेत येण्याचं अनेकांचं स्वप्नं असतं. आपला अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर ज्याला त्याला आपलं स्थान मिळवायला लागतं. देवमाणूस फेम मंजुळा म्हणजेच अभिनेत्री प्रतिक्षा जाधवच्या बाबतीत हेच घडलं. तिनेसुध्दा आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलं. मंजुळा ही भूमिका साकारल्यानंतर लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रतिक्षा जाधव आता झी युवा वरील लोकप्रिय मालिका तुझं माझं जमतंय मध्ये पम्मीच्या भूमिकेत झळकतेय .. नुकतीच या मालिकेत प्रतिक्षाची एंट्री झाली. तिच्या या नवीन भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांकडून भरभरून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. पण एकेकाळी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्याचा खुलासा प्रतिक्षाने केला आहे.

प्रतिक्षाचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे. तसंच आता पम्मी या भूमिकेमुळेसुध्दा तो आणखी वाढतोय. अभिनय क्षेत्रातील सुरक्षिततेबद्दल बोलताना ती म्हणाली, “ग्लॅमर इंडस्ट्रीतील झगमगाट जसा सगळ्यांना दिसतो तसंच या क्षेत्रातील घटना देखील लगेच चव्हाट्यावर येतात. त्यांचा गवगवा होतो म्हणून या क्षेत्राला नावं ठेवली जातात. खरं तर प्रत्येक क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात काही घटना घडत असतातच. तुम्ही स्वतःला कसं सादर करता, कोणत्या वर्तुळात वावरता, आणि तुमच्या मतांवर किती ठाम राहता यावर सगळं अवलंबून असतं. सुरुवातीला या क्षेत्रात येण्यासाठी मला देखील घरून विरोध झाला होता; मात्र आता पाठिंबा मिळतोय.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive