By  
on  

पाठकबाई फेम अक्षया देवधरने शेअर केला व्हिडीओ, लवकरच घेऊन येतेय काहीतरी खास

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. मालिकेतली तिची अंजलीबाई म्हणजेच पाठकबाई ही व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली. याशिवाय राणादा आणि अंजलीबाईंची केमिस्ट्रीसुध्दा प्रेक्षकांना तुफान भावली. या मालिकेने अलिकडेच म्हणजेच दोन महिन्यांपूर्वीच रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाठकबाई फेम अक्षया देवदर चाहत्यांच्या संपर्कात असते. 

सोशल मिडीयावरुन आपले विविध लुक्स आणि झक्कास व्हिडीओमधून अक्षया चाहत्यांचं मनोरंजन करते. आता अक्षया चाहत्यांसाठी काहीतरी लवकरच घेऊन येतेय, म्हणूनच त्याची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची उत्सुकता तिने ताणली आहे. आत्तापर्यंत 40 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

या व्हिडीओत अक्षया झक्कास अशा वेस्टर्न आऊटफिटमध्ये पाहायला मिळतेय.  आता हा नेमका कसला व्हिडीओ आहे हे लवकरच कळेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive