By  
on  

बोल्ड फोटो पोस्ट केल्याने ही प्रसिध्द मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यातलं अंतर बरच कमी झालं आहे. पूर्वीसारखं नाही, की लाडक्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी जीव वेडापिसा व्हायचा. आता सेलिब्रिटीच आपल्या प्रत्येक क्षणांचे अपडेट चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात. पण कौतुकाच्या वर्षावासोबतच कधीकधी या कलाकारांना ट्रोलिंगचा देखील सामाना करावा लागतो. असेच काहीसे अभिनेत्री तेजस्वीनी पंडितसोबत घडले आहे. पण ती तेजस्वीनी देखील शांत बसली नाही. तिने या ट्रोलरला सडेतोड उत्तर देत त्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

तेजस्वीनीने नुकताच  तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा वनपिस परिधान केला असून ती बेडवर बसली आहे. या लूकमध्ये तेजस्वीनी खुपच बोल्ड दिसतेय. हा फोटो शेअर करत तिने ‘A Chameleon Soul’ असे कॅप्शन दिले आहे. 

 

 

 

 

 

तेजस्विनीच्या या फोटोला ५०  हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पण एका ट्रोलरने कमेंट करत तेजस्वीनीला ट्रोल केले आहे. त्याने कमेंट करत ‘जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे…’ असे म्हटले आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive