By  
on  

परश्या म्हणजेच आकाश ठोसरचा हा व्हिडियो तुम्हाला नक्कीच आवडेल

मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर '१९६५ द वॉर इन द हिल्स' या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमात त्याचा हटके लूक दिसतो आहे. या दरम्यान त्याने एक व्हिडियो शेअर केला. यामध्ये तो कुस्ती खेळताना दिसतो आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

या व्हिडियोच्या कॅप्शनमध्ये आकाश म्हणतो, ‘खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी...!! "लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत 5 वर्ष काढली.'तालीम' जोर,बैठका, डावपेच,शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.

तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव,गप्पा-गोष्टी...अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत.लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे.आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो.या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा,पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय.

या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला,खेळायला आणि लढायला शिकवलं त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद... खरंतर आभार , धन्यवाद हे शद्ब कितीही केलं तरी तुम्हा सगळ्यांसाठी अपुरे आहेत...तरीही तुमचा सर्वांचा मी सदैव ऋणी राहील आणि मातीशी हे माझं नातं असच घट्ट राहील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive