By  
on  

अभिनेता संदीप पाठकचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून तुम्ही हसू आवरु शकणार नाही

चतुरस्त्र भूमिकांमधून आपली छाप पाडणारा प्रयोगशील अभिनेता म्हणून संदीप पाठक सिनेविश्वात ओळखला जातो. २०१०मध्ये आलेल्या 'श्वास'मधील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एक डाव धोबीपछाड', शहाणपण देगा देवा', 'रंगा पतंगा', 'पोस्टर गर्ल' यांसारख्या चित्रपटांतून, 'फू बाई फू', 'घडलंय बिघडलंय', 'असंभव', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', अशा मालिकांतून, 'असा मी असामी', 'लग्नकल्लोळ', 'जादू तेरी नजर', 'ज्याचा शेवट गोड', 'सासू माझी धांसू' या नाटकांतून तो प्रेक्षकांसमोर आला. पण त्याच्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला'चा वेगळा प्रयोगही खुप गाजतोय. देशा-परदेशात त्याचे प्रयोग हाऊसफुल्ल होतायत. 

व-हाड निघालंय लंडनला स्टाईलमध्ये तौडा कुत्ता टॉमी या भन्नाट व्हायरल गाण्यावर संदीपने नुकताच एक धम्माल व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मिडीयावर संदीपने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहते भरभरून प्रतिसाद देतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive