By  
on  

'माझा होशील ना' फेम गौतमी देशपांडे शेअर केला हा जुना फोटो

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या अदकारीचे अनेकजण चाहते आहेत. पण मृण्मयीची बहीण गौतमी देखील उत्तम अभिनेत्री आहे. माझा होशीलना या मालिकेमुळे गौतमी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतली सई म्हणून गौतमीने तमाम रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिची आणि विराजसची या मालिकेतली केमिस्ट्री अफलातून आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून गौतमी देशपांडे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. 

गौतमी नेहमीच तिचे विविध सुंदर आऊटफिटमधले फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. पण नुकतंच तिने पाच वर्षांपूर्वीचा एक फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

 

सुट्टी एन्जॉय करतानाचा हा गौतमीचा फोटो नेटक-यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या फोटोला 66 हजारांहून अधिक चाहत्यांनी पसंती दर्शवलीय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive