By  
on  

हॅलो चश्मीश ! या मराठी अभिनेत्रीच्या आईनेच केलं तिचं फोटोशूट

अल्पावधितच मराठी सिनेविश्वातली गोड-गोजिरी आणि गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीव हिने आपलं स्थान निर्माण केलं आहे. काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचली आणि तिने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मिडीयावर अभिनेत्री सायली संजीवच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती असते. इन्स्टाग्राम अकाउंटवर तर सायलीचे 1 मिलीयन चाहते आहेत. शिवाय सायलीदेखील तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही पोस्ट करत असते. 

सायलीने अलिकडेच काही फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले होते. ते क्युटवाले फोटो पाहून तुम्हीही तिला म्हणाल, हॅलो चश्मीश..कारण शॉर्ट डेनिम स्कर्ट परिधान केलेल्या सायलीने चश्मा लाऊन छानसं फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचं खास वैशिष्ट्य म्हणजे सायलीचे हे सुंदर फोटो दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क तिच्या आईनेच क्लिक केले आहेत. 

 

सायलीच्या ह्या फोटोशूटसाठी चक्क तिची आईच फोटोग्राफर बनल्याने चाहत्यांनी या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive