By  
on  

महिला दिनानिमित्त दिसला अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा हटके अंदाज, पाहा फोटो

आज जगभरात विविध प्रकारेमहिला दिन साजरा केला जातो आहे. जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या स्त्रीप्रती कृतज्ञता आज व्यक्त केली जात आहे. सेलिब्रिटीही आपल्या परीने हा दिवस साजरा करत आहेत. 
अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेही हटके फोटो शूट करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये पहिला लूक आहे उसतोड महिलेचा. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रार्थना म्हणते, 

 

 

जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम.
सौ. ज्योती अडागळे
सोनं पिकवाया लावते जोर,काळ्या आईची खंबीर पोर!
संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.

 

 

तिचा दुसरा लूक आहे, मासे विक्रेती महिलेचा. सौ. सुषमा माळी
जसं लग्न झालं, तसं ती नवऱ्यासोबत मासेविक्री करते. संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी. हे कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 

 

 

तर तिसरा लूक शेतकरी महिलेचा आहे.  सौ. रत्ना वाघमारे काळया आईची सेवा, हाच तिच्या जिंदगीचा अनमोल ठेवा. संसार उभा करत देशाच्या अर्थव्यस्थेला उभी करणारी नारी.  चाहते प्रार्थनाच्या या संकल्पनेचं कौतुक करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive