By  
on  

सात बायका आणि त्यांच्या धमाल ट्रीपची गोष्ट दिसतीये ‘झिम्मा’च्या टीजरमध्ये

झिम्मा म्हणलं की समोर येतो ते सगळ्या त-हेच्या स्त्रियांचा मेळ. आज महिला दिनाचं औचित्य साधत हटके झिम्मा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात तगडी आणि हटके स्टारकास्ट असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. 

 

 

या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिका आहेत. ट्रीपला निघालेल्या सात बायकांची गोष्ट या टीजरमध्ये दिसते आहे. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या बायका ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी काय धमाल उडेल हे समजण्यासाठी मात्र सिनेमाच पाहावा लागेल. येत्या २३ एप्रिलला ‘झिम्मा’ प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive