By  
on  

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी घेतलं करोना वॅक्सीन, शेअर केला फोटो

मराठी सिनेविश्वाचे महागुरु आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी करोना  प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरण करतानाचा ब्रांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या लसीकरण केंद्रातला फोटोसुध्दा सचिनजींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांशी शेअर केला आहे. त्यांच्या आईनेसुध्दा यावेळी करोना वॅक्सीन घेतल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच वॅक्सीन देणा-या डॉक्टरांचेसुध्दा सचिन पिळगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत. 

 

 

 

सचिन पिळगावकर यांच्याव्यतिरिक्त बॉलिवूडच्या  आणखी काही सेलिब्रेटी सुद्धा करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सैफ अली खान, राकेश रोशन, अलका याग्नीक, सतीश शाह, शिल्पा शिरोडकर या सेलिब्रेटींनी सुद्धा करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive