By  
on  

या मराठी अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, शेअर केली पोस्ट

लॉकडाऊन दरम्यान अनेक सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला. अजूनही अनेक जण आपली गोड बातमी चाहत्यांशी शेअर करतायत. यापैकीच मराठी मालिका व नाटकांमधला अभिनेता श्रीकर पित्रेच्या घरी चिमुकल्याचं आगमन झाल्याचं त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगितलं आहे. 

श्रीकर नुकताच बाबा झाला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला मुलगा झाल्या असल्याचं कळवलं आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. जो आम्हाला मदर्स डे आणि फादर्स डेच्या शुभेच्छा देईल अशा पाहुण्याचं स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे”, अशा कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

 

 

 

ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, नांदा सौख्यभरे  अशा काही मराठी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive