By  
on  

हा मराठी अभिनेता पुन्हा चढला बोहल्यावर, पाहा लग्नाचे फोटो

सध्या सर्वत्र लग्नसराईचे हंगाम आहे. अनेक जोड्या लग्नबंधनात अडकतायत. लॉकडाऊन दरम्यान पुढे ढकलण्यात आलेली लग्नं यंदा पार पाडली जातायत. अशातच कलाविश्वातही लगीनसराई पाहायला मिळते. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमधला एक प्रसिध्द संग्राम समेळ ह्यानेसुध्दा लग्नगाठ बांधली आहे. परंतु तो दुस-यांदा बोहल्यावर चढला आहे.  संग्राम नुकताच लग्नाच्याबेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संग्राम समेळनं श्रद्धा फाटक हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धा ही एक कोरिओग्राफर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा इचलकरंजी याठिकाणी पार पडला. संग्रामचं हे दुसरं लग्न आहे, याआधी संग्रामने 2016 मध्ये 'रुंजी' फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलशी विवाह केला होता.

 

 

 

पल्लवी आणि संग्राम हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झाली आणि मग या दोघांनी लग्नं केलं होतं. मात्र हे नात फार काळ टिकलं नाही.

संग्राम हा मुळचा ठाण्याचा आहे त्यानं कॉमर्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. संग्रामला अभिनयाचा वारसा घरातूनचं मिळाला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive