By  
on  

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अमृताचं हे आहे योगा रुटीन, पाहा व्हिडीओ

फिट राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. ते रुटीन त्यांच्या जीवनाचं अविभाज्य घटक असतं. चंदेरी दुनियेत चमकण्यासाठी व स्वत:चं व्यक्तिमत्त्व उजळवण्यासाठी जिम, व्यायाम , योगा यांना प्राधान्य दिलं जातं.  तसचं डाएटवर त्यांचं पुरेपूर लक्ष असतं. न चुकता वर्क आउट करण्यावर या सेलिब्रिटीजचा भर असतो.

मराठी सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. वर्कआउट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो. नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. दिवसाची सुरुवात योगाने करत तिने हा व्हिडीओ चाहत्यांसाठी पोस्ट केलाय. या व्हिडीओत अमृता विविध  योगासनं करताना पाहायला मिळतेय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive