By  
on  

प्रिया बापट-उमेश कामतच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज

प्रिया बापट आणि उमेश कामत ही सिनेसृष्टीतील लाडकी सेैलिब्रिटी जोडी आहे. सर्वांनाच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं जितकं कौतुक वाटतं तितकं ऑफस्क्रीनही वाटतं. हे दोघं पडद्यावर रोमॅण्टीक आहेतच पण प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा यांची केमिस्ट्री फॅन्सना खुप आवडते. त्यांच्या सोशल मिडिया पोस्टवरून याचा प्रत्यय येत असतो. ही सेलिब्रिटी जोडी अनेकदा रोमॅण्टीक फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

प्रिया -उमेश या जोडीच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. या जोडीची सुपरहिट रोमॅण्टीक वेबसिरीज आणि काय हवंचा 3 रा सीझन येतोय. याचीच घोषणा प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतीच केली. दिग्दर्शक वरुण नार्वेकर या गाजलेल्या सिरीजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. 

प्रियाने इन्स्टाग्रामवर आपण आणि काय हवं सीन ३ च्या चित्रिकरणाचा शुभारंभ केल्याची पोस्ट फोौटोसहित शे्अर केलीय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रियाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सर्वच कलाकार मडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive