By  
on  

दृष्टिहीन कलाकारांच्या अभिनयाने सजलेला पहिला मराठी सिनेमा ‘दृष्टांत’

आशयघन विषयांसाठी जगभर ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सातत्याने आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. मराठी चित्रपटांची ही 'अर्थ'पूर्ण भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. दृष्टांत सुद्धा प्रेक्षकांना आपलेसे करेल यात शंका नाही. 

‘दृष्टांत’ सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात सुरु आहे. चित्रपटातील कलाकार हे वास्तविक जीवनात सुद्धा दृष्टिहीन असून  त्यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत हे भारतीय सिनेमाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या चित्रपटाचे भाग आहेत. 

अभिजित के झांजल दिग्दर्शित 'दृष्टांत' हा चित्रपट इच्छुक दृष्टिहीन कलाकार आणि लोकांसाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळे सामान्य लोकांना जगाला चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल. 

सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यामध्ये झाले असून, मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा कलाकार अजिंक्य याभोवती चित्रपटाची मुख्य कथा आधारित आहे. या चित्रपटात बबिता, रतन आणि योगेश राव या कलाकारांच्या देखील  महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जीवनातील महत्व आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दृष्टिहीन आणि ज्यांना ऐकू येत नाही अशा लोकांना बघता आणि ऐकता येईल याची विशेष काळजी घेतली आहे. 

चित्रपट बनवण्या मागचा मुख्य उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि तसेच अवयव दान आणि सामाजिक दृष्ट्या कमी भाग्यवान व्यक्तीला मदत करणे हे आहे. 

बीएम प्रॉडक्शन्स आणि पोलराइड मीडिया निर्मित, त्रिपुर सिंग, तन्मय तेलंग आणि हर्षवर्धन हे चित्रपटाचे निर्माते आहेत.सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम वेगात सुरु आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive