By  
on  

मनातल्या स्वप्नांना वाट करून देणारं ‘रंपाट’ चं नवं गाणं, अभिनय कश्मिराची केमिस्ट्री

गाणं कोणत्याही सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. रवी जाधव यांच्या ‘रंपाट’मध्येही एक धमाल साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘आईच्यान रे’ असे बोल असलेल्या या गाण्यात मिथून म्हणजेच अभिनय बेर्डेची धमाल दिसत आहेच. याशिवाय मुन्नी म्हणजेच कश्मिरा हिचं ही दर्शन घडत आहे. दोघंही आपल्या स्वप्नांच्या दिशेने म्हणजे मुंबईच्या वाटेवर निघाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=l4YD2vqn0Tc

विशेष म्हणजे या गाण्यात अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर कॅमिओ करताना दिसत आहेत. या गाण्यावर चिनार आणि महेशने संगीतसाज चढवलं आहे. तर हे गाणं बेला शेंडे अणि हर्षवर्धन वावरे यांनी गायलं आहे. गुरु ठाकूर यांचे बोल आहेत. या गाण्यात अभिनयच्या आईच्या भूमिकेत प्रिया बेर्डे दिसून येत आहे. फेमस व्हायचं या दोघांचं स्वप्न पुर्ण होणार का यासाठी सिनेमा पाहावा लागेल. हा सिनेमा १७ मे २०१९ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive