By  
on  

स्वप्नील जोशीच्या बळीचा अंगावर शहारे आणणारा टीजर पाहाच

अभिनेता स्वप्नील जोशी आता ‘बळी’ नावाच्या हॉररपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीजर समोर आला आहे. या टीजरमध्ये एका हॉस्पिटलचा सीन समोर येतो. यामधे या पार्श्वभूमीवरच सगळ्या घटना घडताना दिसतात. 

 

 

यासोबतच ‘एलिझाबेथ’ अशी लहान मुलाच्या आवाजातील हाकही ऐकू येताना दिसते. या हॉरर सिनेमाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलं आहे. या टीजरमध्ये पुजा सावंतही नजरेला पडताना दिसते. पुजाच्या अंगावर डॉक्टरचा अ‍ॅप्रनही दिसतो आहे. पुजाची या सिनेमातही हटके भूमिका दिसणार यात शंका नाही. बहुप्रतीक्षित ‘बळी’ हा सिनेमा १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive