By  
on  

....आणि भरत जाधव यांना अशी सापडली गलगले यांची व्यक्तिरेखा

विनोदी भूमिकांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेता भरत जाधव अनेकदा त्यांच्या आवडत्या भूमिकांबाबत चाहत्यांशी शेअर करत असतात. आताही त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. भरत यांच्या काही खास भूमिकांपैकी एक म्हणजे गलगले. सही रे सही या नाटकातून भरत यांनी गलगले या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांच्या मनात ठसवलं. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

या भूमिकेविषयी शेअर करताना भरत म्हणतात, ‘१९९४ सालची गोष्ट आहे. एकदा पुण्यात बालगंधर्वमध्ये प्रयोग होता. त्यावेळी बालगंधर्वच्या समोरच्या चहाच्या टपरीवर चहा पीत असताना एक व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला दिसले. ती व्यक्ती, 'डावीकडे पाहा, आता उजवीकडे पाहा...चला रस्ता ओलांडूया' अशी वाक्य स्वतःशीच बोलताना मला दिसली. त्या पाच-सहा वाक्यांनी मला गलगले सापडले. १९९४ साली ती व्यक्तिरेखा सापडली पण या व्यक्तिरेखेचा वापर कुठे करायचा हा प्रश्न होता. महेश मांजरेकरांच्या 'प्राण जाये पर शान ना जाये' सिनेमामध्ये मी हा प्रयत्न केला. पण लोकांना नेमकी ही व्यक्तिरेखा कळेल का, प्रेक्षकांचा गोंधळ उडणार नाही ना, अशी साशंकता मनात होती.
मग २००२ मध्ये 'सही रे सही'मध्ये ही व्यक्तिरेखा चपखल बसली आणि लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. पुढे यावरूनच एक चित्रपटही केदारने बनवला. गलगले निघाले..!!’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive