By  
on  

या खास अंदाजात गायक रोहित राऊतने दिल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘सा रे ग म प लिटिल चॅम्पस’ मुळे प्रेक्षकांचा गळ्यातील ताईत बनलेला गायक रोहित राऊत सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. यावेळी रोहितने सोशल मिडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. रोहितने पहिल्यांदाच त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. रोहितची गर्लफ्रेंड आहे गायिका जुईली जोगळेकर.

 

 

अलीकडेच जुईलीचा वाढदिवस झाला. यावेळी रोहितने खास पोस्ट शेअर केली होती. मी तुझा किती आदर करतो आणि माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहिती आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे कॅप्शन रोहितने या फोटोला दिलं आहे. या जोडीच्या फोटोवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. जुईली अलीकडेच ‘सुर नवा ध्यास नवा’ मध्ये दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive