By  
on  

लाल रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये खुललं पूजा सावंतचं सौंदर्य

मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून टॉल आणि ब्युटिफुल पूजा सावंत हे नाव आग्रहानं घेतलं जातं. पूजाने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. सोशल मिडीयावर सतत नवनवे फोटोशूट शेअर करत पूजा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. पूजाने नुकतंच एक लाल रंगाच्या एथनिक ड्रेसमधलं एक छानसं फोटोशूट शेअर करत चाहत्यांंचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 

या  ड्रेसवर पूजाने छान साजेशी अशी ज्वेलरीही परिधान केली आहे. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगली पसंती दर्शवली आहे. 

 

 

 ‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्तर', ‘क्षणभर विश्रांती’, ‘लपाछपी, भेटली तू पुन्हा, ‘विजेता’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसंच  अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या सिनेमातून  बॉलिवूड  पदार्पण केलं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive