By  
on  

पाहा Video : भरत जाधव यांनीसुध्दा मुलांसोबत या ट्रेंडींग गाण्यावर केली धम्माल

सोशल मिडीयावर सध्या विविध ट्रेंडसचा धुमाकूळ सुरु आहे. त्यापैकींच वाथी कमिंग या गाण्याने तर अक्षरश: नेटक-यांना वेड लावलं आहे. याच लाटेवर स्वार होत मराठी सुपरस्टार भरत जाधव यांनी मुलांसोबत एक धम्माल व्हिडीओ सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी शेअर केला आहे. मोठा पडदा गाजवणारे भरत जाधव सध्या केदार शिंदे दिग्दर्शित सुखी माणसाचा सदरा या मालिकेतील चिमणराव या व्यक्तिरेखेतून छोटा पडदा गाजवतायत. या मालिकेतील त्यांची मुलं मौरु आणि मैना यांच्यासोबत ते वाथी कमिंग... या गाण्ययावर जबरदस्त थिरकले. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

भरत जाधव सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. पण त्यांची या गाण्यातील तुफान एनर्जी पाहून चाहते अवाक् झाले आहेत आणि त्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव  करायला सुरुवात केलीय.

  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

भरत जाधव यांनी ानाटक, सिनेमा आणि मालिंकामधून तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.  वाथी कमिंग या गाण्यावर डान्सचे चॅलेंज अनेक सेलिब्रिटींनी स्विकारले. पण मालिकेच्या शूटींगदरम्यान फावल्या वेळेत चाहत्यांसाठी भरत जाधव यांनी केलेली ही धम्माल वाखाणण्याजोगी ठरतेय. या गाण्यावरुन त्यांच्या कौंबडी पळाली...गाण्यावरचा धम्माल डान्स आठवल्याशिवाय रहात नाही...

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive