By  
on  

दोन दगडू मिळून करतायत 'लव सुलभ', जाणून घ्या

टाईमपास 1 मध्ये छोट्या दगडूने आणि टाईमपास 2 मध्ये मोठ्या दगडूने धम्माल उडवून देत सिनेमा सुपरडुपर हिट केला होता. आता ही दोन दगडूंची जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. ती पण लव सुलभ या आगामी धम्माल कॉमेडी सिनेमाच्या निमित्ताने. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. "लव सुलभ" नावाच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.  ठाणे येथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. काही दिवसांपूर्वीच . या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे . 

प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे. 

या सिनेमाच्या सेटवरचा प्रथमेश परबसोबतचा एक स्टायलिश फोटो अलिकडेच प्रियदर्शनने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. 

 

 

 

देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी "लव सुलभ" चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर,  विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन केदार गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive