ब्लॉकबस्टर ‘सैराट’ मधून प्रत्येकाच्या गळ्याचा ताईत बनलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. सैराटने रिंकूच्या गळ्यात राष्ट्रपती पुरस्काराची माळ घातली. त्यानंतर तब्बल २ वर्षांनी रिंकू ‘कागर’ सिनेमाच्या माध्यमातून परत आली आहे. याविषयी बोलताना रिंकू म्हणते, ‘मला सैराटमधील व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी भूमिका साकारायची आहे. मी अशा पटकथेच्या शोधात असते, ज्यात कथेची उत्तम मांडणी असेलच याशिवाय स्त्रीभूमिकाही सशक्त असेल.
कागरमधील राणीची व्यक्तीरेखा अशीच आहे.’ राणीच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना रिंकू म्हणते, राणीही ग्रामीण भागातील मुलगी आहे. मी पण ग्रामीण भागातून आले असल्याने राणीच्या व्यक्तिरेखेचं परफेक्ट बेअरिंग मला सहज जमलं. या सिनेमात रिंकूला राजकारणातील स्त्रीची भूमिका साकारत असल्याने तिने या क्षेत्रातील स्त्रिया कशा वागतात, बोलतात याचं निरिक्षण केलं. त्यामुळे राणी साकारणं तिला फारसं जड गेलं नाही.