By  
on  

‘फुलपाखरु’ मालिकेच्या सेटवर होतय जंगी सेलिब्रेशन, कारण जाणून घ्या

सध्या रसिकांच्या मनावर राज्य करत असलेली मालिका म्हणजे ‘फुलपाखरु’. या मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीवरही रसिकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. रसिकांच्या प्रेमावरच आजवर या मालिकेने बराच मोठा टप्पा गाठला आहे. झी युवावरील या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला आहे. या यशाचं सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं.

यावेळी कलाकारांच्या चेह-यावरील आनंद स्पष्ट दिसून येत होता. या मालिकेत मानसची भूमिका यशोमान आपटे साकारत आहे तर वैदेहीच्या भूमिकेत हृता दुर्गुळे आहे. या जोडीवर रसिकांनी भरपुर प्रेम केलं आहे. यावेळी या दोघांनीही टीमचे आणि रसिकांचे आभार मानले.

Recommended

PeepingMoon Exclusive