By  
on  

अभिनेत्री पुजा सावंतने घुबडाला दिलं जीवनदान, नेटिझन्स करत आहेत कौतुक

अभिनेत्री पुजा सावंतचं प्राणी प्रेम जगजाहीर आहे. मुक्या प्राण्यांच्या हितसंवर्धनासाठी पुजा कायमच तत्पर असते. यापुर्वीही अनेकदा पुजाच्या भूतदयेचा प्रत्यय चाहत्यांना आला आहे. आताही तिच्या एका खास कामगिरीचं चाहते कौतुक करत आहेत. पुजाने एका घुबडाला जीवनदान दिलं आहे. तहानेने व्याकुळ असलेलं एक घुबड पाण्याच्या टाकीत पडलं. पुजा तिथे पोहचेपर्यंत तेथील लोकांनी बाहेर काढलं होतं.

 

 

पण त्याला उपचारांची गरज असल्याने पुजाने त्याला पशुवैद्याकडे नेत उपचार करविले. यानंतर काहीदिवसांनी घुबडाची तब्ब्येत सुधारल्यावर पुजाने त्याला फिल्मसिटीबाहेर असलेल्या जंगलात सोडून दिलं. यासोबत पुजाने या उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचंही आवाहन चाहत्यांना केलं आहे. पुजाने या सगळ्या प्रोसेसचा व्हिडियो चाहत्यांशी शेअर केला आहे. या व्हिडियोमुळे पुजाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive