By  
on  

संस्कृती बालगुडेने शेअर केला ‘तेजल’ नावाच्या या क्युट मैत्रिणीचा व्हिडियो

नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. संस्कृती तिचे अनेक फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहते नेहमीच लाईक्स देत असतात. पण संस्कृतीने एक क्युट व्हिडियो शेअर केला आहे. 
या व्हिडियोमध्ये तिच्यासोबत तेजल नावाची क्युट हत्तीण आहे. ‘तेजलला भेटल्यावर काही सांगायची गरज आहे?’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडियो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये संस्कृती तेजलसोबत खेळताना दिसते आहे. संस्कृती अलीकडेच धरला माझा हात.... या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  या अल्बममध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा  भाऊ अतुल कुलकर्णी नायक म्हणून  झळकला होता.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive