By  
on  

अभिनेता पुष्कर श्रोत्रीने हा लूक शेअर करत फॅन्सना विचारला खास प्रश्न

अलीकडेच प्लॅनेट मराठीच्या आगामी वेबसिरीजची घोषणा झाली आहे. जॉबलेस असं या नव्या वेबसिरीजचं नाव आहे. यामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. पुष्करने नुकताच या सिरीजमधील एक फोटो शेअर केला आहे. 
नवीन वेबसिरीज... नवी भूमिका! सांगा, कोण असेल बरं मी ह्या वेबसिरीज मध्ये? (फोटोमध्ये उत्तराचा क्लू दडलेला आहे!)  हे कॅप्शन देत पुष्करने फोटो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये पुष्कर पोलिस शुजमध्ये दिसतो आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याचा आगामी वेबसिरीजमधील लूक ओळखला आहे. पुष्करसोबत या सिरीजमध्ये सुव्रत जोशी, हरीश दुधाडे, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही वेबसिरीज सात भागांची आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive