By  
on  

अभिनेता गिरिश ओक दिवंगत आईच्या आठवणीत झाले भावूक, शेअर केली ही कविता

ज्येष्ठ अभिनेते गिरिश ओक यांच्या आईचं नुकतंच निधन झालं आहे. यावेळी गिरिश यांनी एक पोस्ट शेअर करत भावनांना वाट करुन दिली आहे. गिरिश यांनी एका कवितेच्या माध्यमातून आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आपल्या पोस्टमध्ये गिरिश म्हणतात, ‘"सौ शशीकला रत्नाकर ओक"

 

 

माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली.
" इथला धीर पुरेनासा होतो
इथलं औषध लागेनासं होतं
इथली हवा मानवेनाशी होते
मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते
बट डोन्ट से द पेशंट ईझ डेड
बट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यू
तिथला धीर खोटा खोटा नसतो
अमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसते
अहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं !
आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेच
तिथल्या हवेत पोल्यूशन नसतं
सगळंच कसं इथल्या पेक्षा अपग्रेडेड असतं
तिथे जगण्या साठी शरीराची गरजच नसते
मग ते थकलं काय नी नसलं काय
फक्त इथल्या आय सी यू च्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणे
ती सोय (?) सूपर आय सी यू ला नाही
पण काळजी करू नका
केस आता
खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहे
सो डोन्ट वरी "
---------------------------
"आई" तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive